दिवाळीचा अध्यात्मिक अर्थ आणि वास्तुशास्त्राशी संबंध दिवाळी हा फक्त आनंद आणि प्रकाशाचा सण नाही, तर तो ऊर्जा परिवर्तनाचा आणि आत्मशुद्धीचा काळ आहे. वास्तुशास्त्रानुसार, या काळात पृथ्वीवरील ऊर्जा (Cosmic Energy) अत्यंत सक्रिय असते. म्हणूनच या दिवसांत घर स्वच्छ करणे, दिवे लावणे, सुगंध, रंगोळी आणि पूजन यांना विशेष महत्त्व दिलं जातं. वास्तुशास्त्रानुसार दिवाळीचे महत्त्व: स्वच्छता आणि ऊर्जा प्रवाह: दिवाळीपूर्वी घराची साफसफाई केली जाते. वास्तुशास्त्र सांगते की — “जिथे स्वच्छता असते, तिथे सकारात्मक ऊर्जा वसते.” धूळ, कचरा आणि जुन्या वस्तू हे “स्थिर ऊर्जा केंद्र” बनतात. त्यामुळे नवीन ऊर्जेला प्रवेश मिळत नाही. दिवाळीतील स्वच्छता म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात नवचैतन्य आणणे. दिवे आणि प्रकाशाचे महत्त्व: दीप म्हणजे अग्नी तत्त्वाचं प्रतीक . वास्तुशास्त्रात अग्नी तत्त्व दक्षिण-पूर्व (आग्नेय) दिशेशी जोडलेले आहे. ...