समाधी स्थळाचे वास्तु परीक्षण. 
समाधी स्थळ म्हणजे एखाद्या महान व्यक्तीचा किंवा अध्यात्मिक विभूतीचा अंतिम विश्रांती स्थान, समाधी स्थळ म्हणजे केवळ एक दगडी रचना नसून तो एक ऊर्जेचा केंद्रबिंदू आहे. अशा स्थळाचे वास्तुशास्त्रीय दृष्टीने परीक्षण करताना केवळ वास्तुशास्त्र नव्हे तर अध्यात्म पर्यावरण आणि पवित्र या सर्व घटकांचा विचार केला जातो. समाधी स्थळाचे स्थान बहुतालच्या परिसरावर समाजावर आणि भाविकांच्या मनोवृत्तीवर दीर्घकाली परिणाम घडू शकते, म्हणूनच त्याचे योग्य परीक्षण करणे महत्त्वाचे आहेत. 
समाधी स्थळ म्हणजे एखादा संत साधू योगी एखादा शूरवीर किंवा उच्च आध्यात्मिक स्तरावर पोहोचलेल्या व्यक्तीच्या शरीराचे अंतिम विसर्जन स्थान.
अनेक वेळा समाधी स्थळ हे श्रद्धा स्थळ म्हणून विकसित होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्त भेट देण्यासाठी येत असतात म्हणूनच त्या जागेची ऊर्जा दिशा पर्यावरण व त्या संबंधित असलेले घटक समजून घेणे महत्त्वाचे ठरते. 
समाधी स्थळाचे वास्तु परीक्षण का आवश्यक आहे. 
कारण त्या जागेचे ऊर्जा संतुलन तसेच सांस्कृतिक व अध्यात्मिक शुद्धतेसाठी, त्याचप्रमाणे निसर्गाशी सुसंवाद इत्यादी घटक पाहणे महत्त्वाचे आहे. 
चुकीच्या दिशेला समाधी झाल्यास त्या जागी नकारात्मक ऊर्जा तयार होऊ शकते तसेच त्या जागेची असंतुलन अवस्था मोठ्या प्रमाणात बिघडवून त्याचा वाईट परिणाम देखील तेथील लोकांवरती होऊ शकतो. 
तसे पाहता समाधीस्थळ म्हणजे एक शक्तीपीठच आहे त्याचे वास्तुशास्त्र योग्य असेल तर त्या ठिकाणी असलेली ऊर्जा ही सकारात्मक, अध्यात्मिक उन्नती ध्यान भक्ती व मानसिक शांती लागते. 
समाधी स्थळाच्या जागेचा व्यवस्थितरीत्या परीक्षण करून अभ्यास केला तर त्या जागेचे स्थान दिशा हवा सूर्यप्रकाश जलप्रवाह यांचा समन्वय साधता येऊ शकतो. 
समाधी स्थळाच्या जवळ आजूबाजूच ला जर वास्तुशास्त्राच्या नियमांचे उल्लंघन झाले तर त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांवर त्यांच्या आरोग्यावर त्यांच्या मनशांती वर आणि आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. 
* शूरवीरांच्या समाधी स्थळाचे वास्तु परीक्षण एक अनुभव. 
* आजच्या विज्ञान युगात जे डोळ्यांनी दिसते त्यावर मानवाचा विश्वास बसतो परंतु या ब्रम्हांडात डोळ्यांनी न दिसणारे कितीतरी घटक कार्यरत आहे. असाच काहीसा अनुभव एका शूर वीरांच्या समाधी स्थळाचे वास्तु परीक्षण करताना मला आला. 
* दिवस होता 13 एप्रिल चा रविवार 
* भोर तालुक्यातील पिसावरे हे गाव या गावात सरदार राजे कृष्णाजी बांदल यांचे समाधी स्थळ आहे.
* तसेच ग्रामदैवत भैरवनाथ व कुलदेवी आई हुमजाई माता तिचेही भव्य मंदिर येथे आहे. वर्षानुवर्ष थोडी दुरावस्थेत असलेले हे समाधी स्थळ याच्या सुशोभीकरण करण्याचे सध्या कार्य चालू होणार आहे. 
* तत्पूर्वी या वस्तूचे परीक्षण करावे यानिमित्ताने आमचे स्नेही श्री अमित बांदल सर तुषार बांदल सर तसेच पिसावरे गावातील समस्त बांदल परिवारातील काही मान्यवर यांच्याशी चर्चा झाली होती. 
* माझ्या मागील दहा वर्षाचा वास्तू परीक्षणाचा अनुभव आहे या क्षेत्रात जवळजवळ 2000 च्या पुढे वास्तूंचे परीक्षण केले आहे. 
* परंतु समाधी स्थळाचे वास्तु परीक्षण हे माझ्यासाठी म्हणूनच होते. थोडी भीती मनात होती. पण साक्षात आई हुमजाई माता तिचे मंदिर याच परिसरात आहे. तसेच साक्षात भगवंत मल्हारी मार्तंड यांचा आशीर्वाद माझ्याबरोबर होताच. 
* 13 एप्रिल वार रविवार या दिवशी आम्ही समाधी स्थळाच्या वास्तूचे परीक्षण करण्याचे ठरविले. 
* 13 एप्रिल च्या मागील रविवारी मी सहकुटुंब मांढरदेवी च्या दर्शनाला गेलो होतो. येताना पिसावरे येथील आई हुमजाई मातेच्या दर्शनासाठी गेलो होतो. त्यावेळी सायंकाळची सात वाजले. तिथे आमची भेट श्री तुषार बांदल तसेच अमोल बांदल व पिसावरे गावातील समस्त बांदल परिवारातील लोकांबरोबर जाऊन त्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी गेलो 
* समाधीस्थळावर गेल्यानंतर काहीसा वेगळा अनुभव जाणवला. एखाद्या वस्तूमध्ये जर सकारात्मक स्पंदन असतील तर आपल्याला बरे वाटते परंतु नकारात्मक स्पंदन असतील तर आपल्या श्वास असंतुलित होऊन जातो. थोडक्यात म्हणजे आपली चंद्र नाडी व सूर्य नाडी वेगळ्या पद्धतीने कार्य करते. 
* तसंच काहीसा अनुभव मला तुझे जाणवला. समाधी स्थळाच्या येथे असलेले पिंपळाचे झाड तसेच काही प्रमाणात कावळ्यांचा येणारा वेगवेगळा आवाज थोडासा मला अस्वस्थ जाणवत होता. 
* तेथून आम्ही मंदिरात आलो काही बांदल परिवारातील जुनी जाणते व्यक्ती ही भेटली. त्यातील काही वृद्ध असलेल्या व्यक्तींनी तसेच तरुण पिढीने आपले काही अनुभव कथन केले. 
* येथील चर्चा झाल्यानंतर आम्ही पुण्याला निघून आलो.
* अमित सरांबरोबर बोलणं करून परीक्षणाची तारीख 13 एप्रिल ही ठरली. 
* तत्पूर्वी आमचे गुरुवर्य श्री बाळू राम सावळे गुरुजी यांच्याही मार्गदर्शनाखाली परीक्षणापूर्वी काय करता येईल याची माहिती घेतली. 
* 12 एप्रिल च्या रात्रीपासून मनात एकच विचार येत होता काय होईल अशी होईल व्यवस्थित होईल का. 
* या विचारांमध्ये रात्र निघून गेली सकाळी लवकर उठून मी व माझे बंधू श्री सचिन भाऊसाहेब बांदल आम्ही दोघेही दुचाकी वरून भोर पिसावरे येथे जाण्यासाठी निघालो. 
* कात्रज बोगदा चालू होण्यापूर्वी मला जास्त झोप येऊ लागली. गाडी थोडा वेळ गेल्यानंतर आम्ही पाणी घेतली. पुन्हा निघालो परंतु कात्रज घाटात आमची गाडी बंद पडली. एक वेगळा प्रकार चा तणाव मला जाणवत होता. आणि डोळ्यावर खूप झोप होती. थोडी थांबत थांबत आम्ही पिसावरे गावांमध्ये नऊ वाजता पोहोचला.
* त्यादिवशी तेथे एका व्यक्तीचा दहावा असल्याने बांदल कुटुंबीयातील बरेच लोकांचे आमची गाठभेट झाली नाही. 
समाधी स्थळाकडे जाण्यापूर्वी आम्ही आईच्या मंदिरात गेलो. 
या समाधी स्थळाचे वास्तूचे परीक्षण करण्याची जबाबदारी घेऊ का नको असा प्रश्न असा कौल आईच्या मंदिरामध्ये मी लावला होता. 
पण काय आश्चर्य आणि माझ्या प्रश्नाचा सकारात्मक उत्तर दिलं मागील रात्रीपासून माझ्या मनावरचा ताण पूर्णपणे नाहीसा झाला. 
एकदम ताकदीनिशी आम्ही आईचा आशीर्वाद घेऊन समाधी स्थळाकडे रवाना झालो. 
समाधी स्थळाच्या आत जाताना काही प्रोसेस करायची होती. ती पूर्ण करून मी अमित सर व सचिन सर आम्ही आपली प्रवेश केला. 
प्रवेश केल्यानंतर पहिल्या समाधी जास्त मध्ये खूप तणाव शारीरिक व मानसिक तणाव असल्याचे जाणवले. वेगळ्या प्रकारची ऊर्जा असल्याचे जाणवायला सुरुवात झाली. काही वेळापूर्वी एकही कावळा त्या परिसरात नव्हता. परंतु जसा समाधी स्थळात प्रवेश केला असंख्य कावळे आजूबाजूला येऊ लागले. 
काही समजेना समाधी स्थळाचे वेगवेगळे अनुभव ऐकले होते .
तनवाचे प्रमाण हळूहळू वाढत होते घाम यायला सुरुवात झाली होती. 
समाधी स्थळाचे चारही बाजू बांधून घेतल्या भस्म भंडारा उदी यांच्या माध्यमातून. 
ब्रह्म तत्वामध्ये बसून मला स्वतःला मी संरक्षण कवच लावून घेतले होते. 
या चारही दिशांची मातीची ऊर्जा चेक केली. 
ऊर्जेचे उत्तर खूप नकारात्मक जाणवले.
असंख्य प्रमाणात गवळण चा आवाज येऊ लागला कावळे फिरू लागले. 
त्यात मी एका समाधी स्थळाकडे पाहिले असता, तेथील झाडावर असलेली घुबड आणि मी एकमेकांकडे टक लावून बघत होतो. 
काही प्रमुख थोडसं सर्प बाजूने येण्याची चाहूल मला जाणू लागली. 
अमित सरांना थोडीशी विनंती करून जे कार्य आहे ते जोरात करण्याची विनंती केली. घाम याला सुरवात झाली ती श्वासांची स्पंदने वाढली होती उलटी आल्यासारखे जानू लागले होते. 
परंतु जास्त वेळ न दवडता तेथील चारही दिशांच्या मातीची ऊर्जा घेऊन तिथून प्रथम आम्ही बाहेर पडलो. 
आणि आईच्या मंदिरात जाऊन बसलो. 
तेथे गेल्यानंतर खूप बरे वाटले.
मंदिरात साधारण दीड तास या विषयावरती चर्चा झाली. 
 गावातील गुरुवर्य हरिभाऊ बांदल हे देखील तेथे आले होते.
त्या जागेच्या संदर्भात कोणती ऊर्जा आहे त्याचा काय परिणाम होतोय या विषयांच्या संदर्भात चर्चा झाली. 
आणि उपाययोजना काय करावे लागते याही विषयासाठी चर्चा झाली. 
त्यानंतर महेंद्र दादा बांदल यांच्याकडे दुपारचे जेवण घेऊन आम्ही पुण्याला रवाना झालो.


 

Comments

Popular posts from this blog